निनावी कॉलनं मुंबई हादरली! ‘या’ रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे पोलिसांना बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा कॉल आला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या फोनची माहिती सर्व यंत्रणा दिली आहे. त्यानंतर दोन्ही स्थानकांवर पाच तासांहून अधिक काळ शोधमोहीमही राबवण्यात आली. मात्र या शोधमोहीमेत काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

नेमके काय झाले

छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात कॉल आल्यानंतर, रेल्वे पोलीस दल आणि बॉम्ब निकामी पथकासह पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकांवर पाच तासांहून अधिक काळ शोधमोहीम राबवली. या दरम्यान, श्वान पथकासह पोलीस यंत्रणेकडून कसून चौकशी करण्यात आली. शहरात पोलिसांना तात्काळ हायअलर्ट जारी केला. मात्र, कुठेही संशयास्पद साहित्य आढळून आले नाही.

तब्बल पाच तास शोधमोहीम सुरू

मुंबईतील सीएसटीएम आणि कुर्ला या दोन रेल्वे स्थानकांवर गुरूवारी रात्री स्फोटाच्या धमक्या मिळाल्या. त्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून रेल्वे स्थानकांवर शोधमोहीम राबवण्यात आली. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतरही कोणतेही संशयास्पद साहित्य न मिळाल्याने पोलीस आणि रेल्वेने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती गोळा केली जात आहे. सुरक्षा एजन्सीने जबलपूर येथे कॉल करण्याचा शोध घेतला आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यापूर्वीही आले निनावी कॉल

यापूर्वीही असे निनावी कॉल आले असून अशा प्रकरणांमध्ये काहींना अटकही करण्यात आली आहे. या धमकीच्या फोननंतर सध्या मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर दहशतवाद्यांच्या यादीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने या महानगराला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here