मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! ५ ऑक्टोबरला वाहतुकीत होणार ‘हे’ बदल; अनेक मार्गावर ‘प्रवेशबंदी’, तर काही भागात ‘नो पार्किंग झोन’

158

दसरा मेळाव्याला ऐतिहासिक गर्दी जमवत शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. दसरा मेळाव्याला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत सुद्धा महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. बीकेसीला मुख्यमंत्र्यांचा मेळावा असल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत…

( हेही वाचा : १० वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ३००० पदांसाठी भरती, येथे करा अर्ज)

बीकेसी मेळाव्यासाठी वाहतूक बदल

  • पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सी-लिंककडून बीकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहिल.
  • संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्लात्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी असणार आहे.
  • खेरवाडी शासकीय वसाहत कनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी असेल.
  • सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरून बीकेसी परिसर, धारावी, वरळी सी-लिंकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेशबंदी राहिल.
  • पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, बीकेसीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी

५ ऑक्टोबरला संपूर्ण बीकेसी परिसरात नो पार्किंग संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

  • पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सि. लींक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने फॅमीली कोर्ट जंक्शन येथून यु टर्न घेवुन, (खेरवाडी वाहतूक. वि. हद्दीत एमएमआरडीए जंक्शन येथुन डाये वळन घेवुन टि जंक्शन वरून कुर्ला कडे तसेच पुर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.
  • संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कमटॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक हॉस्पीटल जवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून पुढे कुर्ला कडे मार्गस्थ होतील.
  • खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टीच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथुन युटर्म घेथुन (खेरवाडी वा.वि. हद्दीत) शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे ( धारावी वा.वि. हद्दीत ) टि जंक्शन पुढे वरून कुर्ला कडे मार्गस्थ होतील.
  • सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
  • पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, बीकेसीच्या दिशेने जाणारी सर्व चाहने सायन सर्कल येथे उजवे वळण घेवुन टि जंक्शन, कलानगर जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

शिवाजी पार्क मेळाव्यासाठी करण्यात आलेले वाहतूक बदल

वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग

१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)

पर्यायीमार्ग :- सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुगीज चर्च मेखले रोड या रस्त्याचा वापर करावा.

२. राजा चौक जंक्शन से केरकरमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.

पर्यायीमार्ग:- एल. जे. रोड, गोखले रोड- स्टिलमैन जंक्शन वरून पढे गोखले रोड चा वापर करतील.

३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहीनी.
पर्यायीमार्ग – राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.

४. गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.

पर्यायीमार्ग:- एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.

वाहने उभीकरण्यास प्रतिबंध असलेले रस्ते :

  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बॅक सिग्नल)
  • केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
  • एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.
  • पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर.
  • दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर.
  • दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड) दादर.
  • एन. सी. केळकरमार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर.
  • एल. जे. रोड, राजा बडे सिग्नल ते गडकरीजंक्शन
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.