विद्यापीठाच्या सिनेट सभेत सिनेट सदस्य प्राध्यापक डाॅक्टर वैभव नरवडे यांनी कुलगुरुंनी कायदा मोडल्याचे सांगितले. वैभव नरवडे यांनी कुलगुरूंनी घेतलेल्या नियुक्तीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठातील प्राध्यापक, संचालक आदी पदांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार हे कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेला आहेत, मात्र कुलगुरु प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी नियुक्तीचे सर्वाधिकार घेतल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले.
कुलगुरूंची सारवासारव
या सभेत सिनेट सदस्य प्राध्यापक डाॅक्टर वैभव नरवडे यांनी कुलगुरूंनी घेतलेल्या नियुक्तीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर कुलगुरुंनी सारवासारव करत व्यवस्थापन परिषदेनेच आपल्याला हे अधिकार दिल्याचा खुलासा केला, मात्र यावर समाधान न झाल्याने डाॅक्टर नरवडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा: आनंदाची बातमी! स्वराज्याची राजधानी रायगडसाठी घेण्यात आला ‘हा’ निर्णय )
पण दुर्लक्ष केले गेले
कुलगुरु स्वत:कडे अधिकार घेत आहेत. हे अधिकार घेऊन ते कोणाचे हितसंबंध जोपासत आहेत, तसेच याबाबत दखल न घेतल्यास पुढील मार्गाचा अवलंब करु, असा इशारा सुद्धा डाॅक्टर नरवडे यांच्याकडून देण्यात आला. याआधीही डाॅक्टर नरवडे यांनी 8 फेब्रुवारीला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय आला, तेव्हा आपला विरोध नरवडे यांनी दर्शवला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community