मुंबईत विलेपार्ले येथे सिलिंडरचा स्फोट; ५ लोक जखमी

139

मुंबईतील विलेपार्ले परिसरात मंगळवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. विलेपार्ले (पूर्व) येथे मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वेवर ११ नोव्हेंबरला धावणार विशेष गाडी; पहा संपूर्ण वेळापत्रक )

पाच जण जखमी

महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील न्यू कल्पना चाळ येथे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात २७ ते ४५ वयोगटातील पाच जण जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत अमर राय (२७), जयराम यादव (२७), हरेकुमार राय ( ३८), राकेशकुमार राय (३०), अजय कुमार राय (४५) हे पाच जण जखमी झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.