सरकारी नोकरी हवी आहे रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा आहे तर ही बातमी वाचा. पश्चिम रेल्वेमध्ये मोठी भरती निघाली असून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेतील पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करा. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सर्व पात्र उमेदवार पश्चिम रेल्वे भरती 2022 साठी आयोजित केलेल्या वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता रेल्वे माध्यमिक शाळा (इंग्रजी माध्यम), वलसाड गुजरात (वेस्ट यार्ड रेल्वे कॉलनी) येथे मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
या पदांवर होणार भरती
अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेतून टीजीटी (हिंदी) साठी 1 पद, टीजीटी (गणित) साठी 1 पद, टीजीटी (विज्ञान) साठी 1 पद, टीजीटी (संस्कृत) साठी 1 पद, टीजीटी (सामाजिक विज्ञान) साठी 1 पद, टीजीटी (फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन) साठी 1 पद, टीजीटी (कम्प्युटर सायन्स) साठी 1 पद आणि असिस्टंट टीचर (प्रायमरी टीचर) या 4 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9:00 ते 12:00 या वेळेत मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट पाहता येईल.
(हेही वाचा- २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा, एसटी कामगारांना न्यायालयाचा आदेश)
शैक्षणिक पात्रता काय हवी?
रेल्वे माध्यमिक विद्यालयातील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाच्या पदांवरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारानी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयांत पदवीधर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच, उमेदवारांकडे शिक्षणाची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तर TGT पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 26,250 रुपये आणि प्राथमिक शिक्षक पदांसाठी 21,250 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.