मुंबईकरांच्या ऑफिसमधल्या ‘दांड्या’ वाढल्या! ‘हे’ आहे कारण

133

कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वी सामना केल्यानंतर अचानक अंगवळणी पडलेल्या वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेत आता पुन्हा कार्यालयीन वेळ गाठण्यात मुंबईकरांची अपुरी झोप चांगलीच डोकेदुखी होऊ लागली आहे. गजर लावूनही पुन्हा झोपत दोन वर्षांच्या वेळापत्रकाची झोप पूर्ण करणारे मुंबईकर आठवड्यातून किमान दोनदा कार्यालयात खाडा करु लागले आहेत.

रात्री अपरात्री जागून ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद लुटत लॉकडाऊन काळात ऑनलाईन कार्यालयाची वेळ गाठण्यापूर्वी अगदी अर्ध्या तासापूर्वी उठण्याची सवय आताही सुटत नसल्याने मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपट उडालीय. लॉकडाऊनने मुंबईकरांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडवले. मध्यरात्रीपर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेबसिरीज पाहताना सकाळी लवकर उठण्याची सवयच मुळात तुटल्याची कबुली कित्येक तरुण देताहेत. याचा फटका महिलावर्गालाही विशेष बसला आहे. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करुन कार्यालायसाठी प्रवास करण्याच्या वेळापत्रकाची महिलांना जवळपास विसरच पडला होता. त्यात अधूनमधून पुन्हा वर्क फ्रॉम पुन्हा सुरु होते. काही दिवसांसाठी पुन्हा कार्यालयाला जावे लागले. कार्यालयीन वेळात नियमितता नसल्याने सकाळी उठण्यात चांगलीच कसरत होत असल्याचे महिला सांगतात.

जीवनशैलीचा परिणाम

बिघडलेल्या झोपेचे वेळापत्रक ही चुकीच्या जीवनशैलीची समस्या असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ सागर मुंदडा सांगतात. ही समस्या आता जवळपास सर्वामध्येच दिसत आहे. ही समस्या सौम्य स्वरुपात असेल तर स्वभावात बदल घडवावा लागेल, असा सल्ला डॉ मुंदडा यांनी दिला.

झोप वेळेवर येण्यासाठी

० झोपेच्या वेळेअगोदर किमान तासभर मोबाईल, संगणकावरील स्क्रीन टाईम बंद करा. जेणेकरून विचारचक्रांचा वेग मंदावेल. हळूहळू मन आणि शरीरावरील ताण कमी होईल. परिणामी झोप येण्यास मदत होईल.
० तुम्ही झोपण्याअगोदर तुमचे आवडते सौम्य स्वरुपातील गाणे ऐका. मेडिटेशन करा
० वेळेवर उठण्यासाठी तुम्ही ठराविक वेळी उठणा-यांचा एक ग्रुप तयार करा. एक उठला की इतरही सततचे फोन आणि मॅसेज नॉटिफिकेशनचा सततचा मोबाईलमधील आवाज ऐकून उठतील.

प्रयत्न करुन सुद्धा झोपेची वेळ पूर्ववत होत नसेल तर …

प्रयत्न करुनही झोपेची वेळ पूर्ववत होत नसेल तर तुम्हांला वैद्यकीय सल्ल्याची गरज असल्याचा माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ सागर मुंदडा यांनी दिली. त्यासाठी रुग्णांची माहिती घेऊन त्यानंतर औषधांचाही सल्ला दिला जातो. मूड अॅक्टिवेटर्सच्या गोळ्या काही दिवस दिल्यानंतर दिवसभर गुंगीसारखे वाटत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.