मुंबईकरांना अतिरिक्त जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

99

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी अनुक्रमे ३० व २० रुपये असे शुल्क आकारले जाते. अर्जदारांना तीन प्रती देण्यात येत असल्या तरी काही अर्जदार जास्त प्रतीची मागणी करतात. त्यामुळे किमान पाच प्रतींपेक्षा अधिक प्रतींची मागणी झाल्यास प्रत्येक प्रतींसाठी सहा रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. त्युळे यापुढे जास्त प्रतींची मागणी केल्यास मुंबईकरांचा खिशात हात घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – चारकोप सेक्टर ७ मधील दुर्गंधी पसरवणारे तलाव कात टाकणार)

मुंबई महापालिकेची २४ विभाग कार्यालये महापालिका मुख्यालय या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. या ठिकाणी १ जानेवारी २०१६ पूर्वीचे जन्म व मृत्यु नोंदणीचे प्रमाणपत्रांसाठी मुंबई महापालिकेचा मार्फत शुल्क आकारले जाते. यामध्ये जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांसाठी तीस रुपये अधिक शोध शुल्क दोन रुपये आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी वीस रुपये अधिक शोध शुल्क दोन रुपये आकारले जाते.

अतिरिक्त शुल्क आकारले जाणार

या नागरी सुविधा केंद्रामध्ये खाजगी संस्थेच्या माध्यमातून सेवा दिली जाते आणि या खासगी कंपनीला प्रत्येक पावती मागे चाळीस रुपये मोजले जातात. यासाठी खासगी कंपनीला विदर्भ इन्फोटेक कंपनीला हे काम दिले आहे. या कंपनीला प्रत्येक पावतीमागे ४० रुपये मोजले जात असले तरी अनेकदा नागरिक ४० ते ५० प्रती देण्याची मागणी करतात. त्यासाठी एकच पावती दिली जाते व संबंधित कंत्राटदाराला पावतीनुसार चाळीस रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे या कामासाठी नेमलेल्या सुविधांसाठी विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रती पावती ४० रुपये आणि पाच पेक्षा अधिक म्हणजे पुढील प्रत्येक प्रतींसाठी प्रत्येकी सहा रुपये याप्रमाणे रक्कम आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केले आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने पन्नास प्रतींची मागणी केली तर त्यांना ४५ प्रतींसाठी प्रत्येकी अतिरिक्त सहा रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

मुंबई महापालिकेची २४ विभाग कार्यालय आणि महापालिका मुख्यालय व प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह अशी एकूण २६ नागरी सुविधा केंद्र चालवली जातात आता त्यामध्ये एल विभागातील तुंगा विलेज आणि भक्तीधाम मंदिर मार्ग तसेच कांजुरमार्ग पूर्व येथील घोडा संकुल येथील बाजार व जकात या ठिकाणी अतिरिक्त नागरी सुविधा केंद्रे विदर्भ इन्फोटेक कंपनी यांच्या माध्यमातून चालविला जात आहेत. ही तीन नवीन सुविधा केंद्र नव्याने सुरु करण्यात आली आहेत. यासाठीही कंत्राटदाराला वाढीव कंत्राट किंमत वाढवून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.