97 वर्षांपूर्वी 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी हार्बरमार्गे सुरु करण्यात आली होती. ही भारतीय रेल्वेची पहिली ईएमयु (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट लोकल) सेवा होती. पहिले 4 डबे असणा-या या लोकलच्या सेवेला मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. भारतीय रेल्वेची ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. पहिल्यांदा 4 डब्ब्यांसह सुरु करण्यात आलेल्या, या लोकलला 15 डब्यांची होण्यासाठी 87 वर्षे लागली.
मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना चार मार्गांवर मुख्य, हार्बर व ट्रान्सहार्बर आणि चौथा काॅरिडाॅर सेवा देत आहे, असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले.
कोणत्या वर्षांत किती गाड्या
- 1925- 150 दैनिक सेवा
- 1935-330 दैनिक सेवा
- 1951- 519 दैनिक सेवा
- 1961- 553 दैनिक सेवा
- 1971-586 दैनिक सेवा
- 1981-703 दैनिक सेवा
- 1991-1015 दैनिक सेवा
- 2011-1573 दैनिक सेवा
- 2020-1774 दैनिक सेवा
( हेही वाचा: जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात अजूनही संघर्ष करतायत अनेक ‘लावण्या’)
ईएमयू प्रकार व सेवेचा वर्षावार इतिहास
- 1925- हार्बर मार्गावर 4 डब्बे
- 1963- मुख्य आणि हार्बर मार्गावर 9 डब्बे
- 1986- मुख्य मार्गावर 12 डब्बे
- 1987- कर्जतच्या दिशेने 12 डब्बे
- 2008- 12 कार कसारा बाजूला
- 2010- ट्रान्सहार्बर लाईनवर 12 डब्बे
- 2011-सर्व मेनलाईन सेवा 12 डब्बे
- 2016- हार्बर मार्गावर सर्व 12 डब्बे
- 2021-हार्बर मार्गावर वातानुकूलित गाडी