राज्याचे माजी गृहमंत्री अनिल यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपली होती. मात्र यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर न्यायालयातील दोन्ही बाजुंनी युक्तीवाद झाल्यानंतर देशमुखांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
https://twitter.com/PTI_News/status/1459071188043403264
आता ईडी कोठडी नको, देशमुखांची विनंती
दरम्यान, न्यायालयात ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे, असे सांगत ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. यावेळी ईडी कोठडीला विरोध करत अनिल देशमुखांच्याकडून युक्तीवाद देखील करण्यात आला. यावेळी अनिल देशमुखांनी मला आता ईडी कोठडी नको, अशी विनंती देखील केली. तर देशमुखांनी असेही म्हटले की, माझा २५ जूनला जवाब घेतला गेला. पीएमएल न्यायालयात हजर केल्यानंतर अनिल देशमुख यांनी न्यायालयाला स्वतः लिहिलेल एक पत्र दिले. ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही तक्रार नाही. आतापर्यंत २०० हून अधिक प्रश्न विचारण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
असा झाला युक्तिवाद
दरम्यान, देशमुखांच्या वकीलांचा युक्तिवाद देखील सुरू असून सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना अजून अटक का करण्यात आली नाही? मी चौकशीसाठी हजर झालो आणि मला अटक झाली. दिवसाला ८ ते ९ तास चौकशी करून ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जात आहे. यासह ईडीने युक्तिवाद करताना असेही म्हटले की, आम्हाला देशमुखांची कस्टडी चौकशीसाठी नको, केवळ त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहे.
Join Our WhatsApp Community