सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात सर्वदूर पसरत आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याआधीच मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ शिफ्टमध्ये कामकाज करावे, असा निर्देश दिला होता. त्याप्रमाणे कामकाज सुरु झाले आहे. मात्र आता सत्र न्यायालयानेही अशाच प्रकारे दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशाप्रकारे चालणार कामकाज!
- सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी हा आदेश दिला आहे.
- पहिली शिफ्ट सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत असणार आहे.
- दुसरी शिफ्ट दुपारी १.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे.
- जर साक्षीदार, वकील अनुपस्थित असतील तर त्या खटल्यावर कोणताही आदेश देणार नाही.
- यामाध्यमातून न्यायालय संबंधितांना दिलासा देणार आहेत.
- सुनावणीच्या वेळीच संबंधित खटल्यातील वकील, आरोपी, साक्षीदार आणि पोलीस यांना कोर्टात प्रवेश दिला जाणार.
- सुनावणी होताच संबंधित खटल्याचे साक्षीदार, आरोपी, वकील आणि पोलीस यांना कोर्टाच्या बाहेर तात्काळ जावे लागणार.
(हेही वाचा : राज्यभरात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी!)
राज्यातही कडक निर्बंधांचे संकेत!
राज्य सरकाराने शुक्रवार, २५ मार्च रोजी राज्यभरात रात्री जमावबंदीचा आदेश लागू केला. रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजल्यापर्यंत रात्री जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जनतेने कोविड नियम पाळले नाही, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू, परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी, तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Join Our WhatsApp Community