हिंदू धर्माची खिल्ली उडवणारा मुनावर फारुखी पुन्हा का होतेय ट्रेंड?

122

स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुखी याने या आधी त्याच्या कार्यक्रमातून कायम हिंदू देवदेवता, धर्मग्रंथ यांच्यावर अश्लाघ्य विनोद निर्मिती करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या कार्यक्रमांना विरोध होत आहे, त्याचे कार्यक्रम होवूच दिले जात नाही. गोवा नंतर कर्नाटकातही त्याचा कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी होवू दिला नाही. मागील २ महिन्यांत त्याचे १२ कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आपण आता या क्षेत्रातून बाहेर पडत असल्याचे सांगणाऱ्या फारूखी याला सोशल मीडियातून जेवढे समर्थन मिळत आहे, त्याहीपेक्षा अधिक विरोध होत आहे. ही माहिती त्याने स्वत:आपल्या इस्टाग्राम हॅंडलवरुन पोस्ट शेअर करत दिली आहे.

काय म्हणतो फारूखी? 

माझा बंगळूरु येथे होणारा काॅमेडी शो रद्द करण्यात आला आहे. मागच्या 2 महिन्यांत हा 12 वा शो आहे, जो रद्द करावा लागला. आमच्याकडे सेंसर सर्टिफिकेट असतानाही या स्थळाला आणि प्रेक्षकांना धमक्या येत असल्याने हा शो कॅन्सल करण्यात आल्याचं त्याने म्हटंल आहे. सोबतच जे मी बोललोच नाही त्यासाठी मला जेलमध्ये डांबलं गेलं, जे खूप चुकीचे आहे. भारतात धर्माच्या नावावर अन्याय केला जातं असल्याचंही त्याने आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता मात्र या लोकांना जे हवं तेच मी करत आहे. आता एक कॅामेडिअन म्हणून माझा प्रवास मी संपवत आहे. माझं नावं मुनावर फारुखी आणि तो माझा वेळ होता. तुम्ही प्रेक्षक म्हणून उत्तम होता. गुड बाय .. अशा आशयाची त्याची पोस्ट आहे.

त्याच्या या पोस्टनंतर जितके त्याला सोशल मीडियामधून समर्थन मिळत आहे, त्याहून जास्त त्याच्यावर टीका केली जातं आहे.

(हेही वाचा :आता अंबाजोगाई मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकी )

विक्रांत नावाच्या सोशल मीडिया युझरने फारूखीने एकदा गोध्रा येथे झालेल्या अग्नीकांडात अमित शहा यांचा हात असल्याचं सांगत जी टिप्पणी केली होती, त्यावरुन त्याला घेरलं आहे. या युझरने फारुखी सारख्याला तर कोणतेच व्यासपीठ उपलब्ध होऊ नये, असे म्हटलं आहे.

अमिश देवगन या सोशल मीडिया युझरने फारुखीला जी माणसं जीवंत जळाली त्यांच्या मृत्यूची कॅामेडी करणं योग्य आहे का, हा जोक आहे का, असा प्रश्न विचारला आहे .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.