महापालिका आयुक्तांचा बदल्यांचा आणि रद्द करण्याचा रेकॉर्ड: गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते!

135
मागील दीड महिन्यांपासून मुंबई महापालिकेत उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या बदल्या केल्या जात असून यापैकी अनेक बदल्या करण्याची नामुष्की आयुक्तांवर आली आहे. मंगळवारी दोन उपायुक्तांची बदली आणि दोन उपायुक्तांवर खात्यांची अदला बदली करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले होते. त्यात केशव उबाळे यांच्याकडे  उपायुक्त (दक्षता)  विभागाची जबाबदारी सोपवून सनदी अधिकारी असलेल्या सह आयुक्त अजित कुंभार यांच्याकडे केवळ शिक्षण विभाग ठेवण्यात आला होता. परंतु अवघ्या एक रात्र उलटायच्या आतच कुंभार यांच्याकडे दक्षता विभाग आणि उबाळे यांच्याकडे शिक्षण विभागाच्या भार सोपवत आयुक्तांना आपले बदली आदेश रद्द करावे लागले. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात सर्वाधिक बदल्या करताना त्या रद्द करण्याच्या या आयुक्तांच्या कामगिरीचा विक्रम नोंदवला गेला असून याची आता गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद घ्यायला हवी, अशी मिश्कील टिप्पणी आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.
राज्यातील ठाकरे सरकारने मुंबई  महापालिकेच्या सहआयुक्तपदी असलेल्या रमेश पवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येताच २२ जुलै रोजी त्यांची या पदावरून उचलबांगडी केली. तेव्हापासून पुनर्वसनाच्या शोधात असलेल्या  रमेश पवार यांची महापालिकेतील मूळ जागेवर पद स्थापना करण्यात आली आहे. पवार यांच्याकडे पुन्हा एकदा सहआयुक्त सुधार) या पदाचा भार सोपवताना या पदी असलेल्या केशव उबाळे यांच्याकडे आता उपायुक्त (दक्षता)  विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडे दक्षता आणि  शिक्षण विभागाची जबाबदारी होती. त्यातील दक्षता विभाग उबाळे यांच्याकडे सोपवत शिक्षण कुंभार यांच्याकडे  ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे दक्षता विभाग अभियांत्रिकी विभागाकडे किंवा सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त यांच्याकडे असणे हा नियम आहे. तसे परिपत्रक आहे. परंतु या परिपत्रक आणि आजवरच्या प्रथेला छेद देत आणि विशेष म्हणजे आयुक्तांची दिशाभूल करत कुंभार यांच्याकडे असलेले दक्षता विभाग उबाळे यांच्याकडे सोपवण्यात आले. या आदेशानंतरच महापालिकेतील अभियंते आणि सनदी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महत्वाचे म्हणजे उबाळे यांच्याकडे सुरुवातीलाच शिक्षण विभागाचा भार सोपवता आला असता. परंतु उबाळे यांच्याकडे दक्षता विभाग यांचा भार सोपवून एकप्रकारे आयुक्तांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली होती. परंतु याबाबत त्यांना कल्पना देण्यात आल्याने रात्री बदली आदेश बदलत कुंभार यांच्याकडे दक्षता आणि उबाळे यांच्याकडे शिक्षण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे.

अशा प्रकारे सुरू झाले बदली सत्र…

४ जुलै २२
  • जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची इ विभागात बदली
  • के -पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची  बदली जी उत्तर विभाग
  • ई- विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांची बदली के -पूर्व विभागात
 १४ जुलै २०२२
  • आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांचीही बदली  घाटकोपर एन विभागात
  • एन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त संजय सोनावणे यांची बदली पुन्हा नगर अभियंता विभागात
१४ ऑगस्ट २०२२
  • बदली करण्यात आलेले सहायक आयुक्त व त्यांचे वॉर्ड
  • ई विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, बदलीचे ठिकाण : पी-उत्तर
  • एफ- दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर : बदलीचे ठिकाण ए विभाग
  • एम -पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त मृदुला अंडे : बदलीचे ठिकाण अतिक्रमण निर्मुलन-शहर, प.उ आणि पू.उ
  • पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील: बदलीचे ठिकाण एफ-दक्षिण विभाग
  • कार्यकारी अभियंता परिवहन विभाग अजयकुमार यादव : बदलीचे ठिकाण ई विभाग सहायक आयुक्तपदी
२९ जुलै २०२२
  • एन विभागाच्या सहायक आयुक्त अंडे यांची बदली  चेंबूर एम पश्चिम  विभागात
  • एन विभागाचे सहायक आयुक्तपदावर पुन्हा  कार्यकारी अभिंयता संजय सोनावणे यांची नियुक्ती
  • एम पश्चिम विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याकडे पूर्णपणे करनिर्धारण व संकलन विभागाचा भार
१४ ऑगस्ट२०२२
  •  अंडे यांची बदली एम पश्चिम  विभागातून अतिक्रमण निर्मुलन विभागात
  • ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली पी उत्तर विभागात,
  • पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील  यांची बदली एफ दक्षिण विभागात
  • एफ- दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची बदली ए विभागात,
  • कार्यकारी अभियंता परिवहन विभागाचे अजयकुमार यादव यांची ई विभागाच्या सहायक आयुक्तपदी
१५ ऑगस्ट २०२२
  • परिमंडळ १ च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन पदाची बदली
  • उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे यांची बदली परिमंडळ एक
 १९ ऑगस्ट२०२२
  • परिमंडळ १ च्या उपायुक्त डॉ. हसनाळे यांच्याकडे पुन्हा अतिरिक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार
२५ ऑगस्ट २०२२
  • उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादर यांची बदली  परिमंडळ दोन पदी
  • परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षद काळे यांची बदली माध्यवर्ती खरेदी खाते
२६ ऑगस्ट २०२२
  • पी -दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष  कुमार धोंडे (बदलीचे ठिकाणी जी -दक्षिण विभाग)
  • जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे (बदलीचे ठिकाणी डि विभाग)
  • डि -विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड (बदलीचे ठिकाणी  मालमत्ता विभाग)
  • पी -दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश अक्रे(सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार)
२७ ऑगस्ट २०२२
  • विश्वास मोटे यांना करनिर्धारण विभागाचा भार काढून त्यांची एम पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्त पदी पूर्ण वेळ नियुक्त
  • एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांच्याकडे कर निर्धारण विभागाचा अतिरिक्त कार्यभार
२ सप्टेंबर २०२२
  • परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त(विशेष) या पदी
  • उपायुक्त(विशेष) संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी
७ सप्टेंबर २०२२
  •  उपायुक्त(विशेष)विजय बालमवार यांची बदली  पुन्हा परिमंडळ चारच्या पदी शिवाय निवडणूक व नियोजन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीचा भार
  • परिमंडळ चारचे उपायुक्त संजोग कबरे यांची बदलीउपायुक्त(विशेष) पदी
१३ सप्टेंबर २०२२
  • सहआयुक्त रमेश पवार यांच्याकडे सुधार विभागाचा भार
  • उपायुक्त सुधार यांची बदली उपायुक्त(दक्षता विभाग)
  • सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडील दक्षता विभाग कमी करून शिक्षण विभाग
  • उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचे अतिरिक्त काम
१३ सप्टेंबर २०२२
  • उपायुक्त सुधार उबाळेयांची बदली उपायुक्त(शिक्षण विभाग)पदी
  • सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडील दक्षता विभाग देत शिक्षण विभागाचा भार कमी केला
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.