Municipal Corporation Election: ९ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ ऑगस्टला आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्ग प्रवर्ग आणि मागासवर्ग प्रवर्ग (महिला) यांच्या आरक्षित जागांसाठी ५ ऑगस्ट २०२२ रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर ६ ते १२ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)

२० ऑगस्टला अंतिम सोडत

या सूचना आणि हरकतींवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाला वेग येणार असल्याचे म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here