दहिसरमध्ये महापालिकेची पहिली ई -लायब्ररी

106

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभिप्रेत असणारी ई- लायब्ररी बोरीवली-दहिसरमध्ये बनवण्यात आली आहे. शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या संकल्पनेतून ही ई लायब्ररी उभारली गेली असून याचे व्यवस्थापन स्वत: महापालिका करणार आहे. नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेली ही लायब्ररी मुंबईतील महापालिकेची पहिली लायब्ररी उभारण्यात आर उत्तर विभागाने बाजी मारली आहे.

नगरसेवक निधीतून हे काम करण्यात आले

आर- उत्तर विभागातील बोरिवली-दहिसरकरांसाठी मुंबईत पहिली अत्याधुनिक ई लायब्ररी बनवण्यात आली आहे. आरक्षण या ई लायब्ररीचे उद्घाटन शिवसेना युवानेते, राज्याचे पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी होणार आहे. आरक्षण समायोजनांतर्गत सात ते आठ वर्षांपूर्वी ही वास्तू सिलिकॉन इमारतीच्या बांधकामांमध्ये महापालिकेला बांधून मिळाली होती. परंतु महापालिकेकडे धोरण नसल्याने हे प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मृदुला अंडे यांनी या संकल्पनेला गती देण्याचे काम केले. नाविन्यपूर्ण असलेल्या या ई लायब्ररीच्या उभारणीमध्ये बारकाईने लक्ष घालत त्यांनी प्रत्येक बाबींचा विचार करत याची रचना केली. नगरसेवक निधीतून हे काम करण्यात आले आहे.

ई लायब्ररीमध्ये विविध स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके

एक मजली इमारतीतील पाच हजार चौरस फुटाच्या जागेत ही ई लायब्ररी बनवण्यात आली असून सुमारे २५ लाखांमध्ये उभारण्यात आलेल्या ई लायब्ररीमध्ये संगणक, सभागृह तसेच विविध स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके ठेवली जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी दिली आहे. बोरिवली पश्चिम आय. सी .कॉलनी सिलिकॉन इमारतीच्या शेजारी दुपारी 12.30 वाजता या अत्याधुनिक ई लायब्ररीचे उद्घाटन होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे. मुंबईतील महापालिकेची ही पहिली ई लायब्ररी असून कोणत्याही खासगी संस्थेच्या माध्यमातून ही लायब्ररी चालवली जाणार नसून प्रथम विभागीय महापालिका कार्यालय आणि त्यानंतर शिक्षण विभागाच्या माध्यमातूनही याची देखभाल राखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट पार्कमध्ये पाळीव प्राण्यांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि केअर सेंटर सन २०१४मध्ये तत्कालिन शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिले पेट पार्क उभारण्यात आले होते. या उपक्रमाचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले होते. त्यामुळे याचे नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. याचे अनावरणही आदित्य ठाकरे यांच्याहस्ते केले जाणार आहे. या नुतनीकरणामध्ये पाळीव प्राण्यांसाठी पूल, प्रशिक्षण केंद्र तसेच पेट केयर सेंटर बनविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.