मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पुरवण्यात येणाऱ्या शालोपयोगी वस्तूंमध्ये गणवेशाचे वाटप करण्यात येते. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे गणवेश खादी कपड्यांमध्ये शिवून मुलांना वितरित करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे. पण महापालिकेच्या शिक्षण विभागाने याला नकार दिला आहे.
शिक्षण विभागाने मारली काट
पण शालोपयोगी वस्तूंमध्ये खादीचा गणवेश समाविष्ट करण्याबाबत २३ ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत सध्या जे गणवेश पुरवले जात आहेत, तेच वापरण्यासाठी योग्य असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुलांना खादीच्या कपड्यातील गणवेश देण्याच्या मागणीवर शिक्षण विभागाने काट मारली आहे.
(हेही वाचाः मुख्यालय इमारतीच्या नूतनीकरणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अडथळा!)
सिद्दीकी यांची मागणी
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या गणवेशामध्ये पॉलिस्टरचा ६७ टक्के अधिक तीन युनिट व उर्वरित कॉटनचा समावेश आहे. हे गणवेश योग्य असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोफत पुरवण्यात येणाऱ्या शालोपयोगी वस्तूंमध्ये खादीचा गणवेश देण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी केली होती.
म्हणून केली होती मागणी
विद्यार्थी दशेपासूनच मुलांमध्ये स्वदेशीची आवड निर्माण होण्याकरता त्यांना खादीच्या वस्तूंचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. तसेच खादीच्या कपड्यांमुळे शरीराला उन्हाळ्यात थंडपणा आणि हिवाळ्यात उबदारपणा मिळतो, याकरता सिद्दीकी यांनी शालेय मुलांना देण्यात येणारा गणवेश हा खादी कपड्यांमध्ये शिवून देण्याची मागणी केली होती.
Join Our WhatsApp Community