भाजपाच्या जडणघडणीत प्रमुख सहभाग असणारे Murali Manohar Joshi

248
भारतीय जनता पक्ष हा आज सर्वात मोठा आणि शक्तिशाली राजकीय पक्ष आहे. या पक्षाच्या जडणघडणीत अनेक ज्येष्ठ नेत्यांचा हात आहे. त्यापैकी एक म्हणजे मुरली मनोहर जोशी. मुरली मनोहर जोशी यांचा जन्म ५ जानेवारी १९३४ रोजी दिल्लीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मनमोहन जोशी आणि आईचे नाव चंद्रावती जोशी होते. मुरली मनोहर जोशी यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण उत्तराखंडमधील अल्मोडा येथून केले.
मेरठ कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी पदवी मिळवली. त्याचबरोबर अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. स्पेक्ट्रोस्कोपी हा त्यांचा संशोधनाचा विषय असून त्यांनी हिंदी भाषेत त्यांचा शोध निबंध सादर केला. हिंदी भाषेत आपले संशोधन सादर करणारे ते पहिले संशोधन विद्यार्थी होते. १९५८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून डी.फिल. ची पदवी घेतली.
मग ते अलाहाबाद विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झाले. या शैक्षणिक कारकिर्दीसह ते १९४४ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९४९ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कामे देखील त्यांनी केली आहेत. १९५७ मध्ये मुरली मनोहर जोशी भारतीय जनसंघात सामील झाले. १९४८ मध्ये संघावर बंदी आणली होती, त्याविरोधात सत्याग्रह केल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
आणीबाणीच्या काळात २६ जून १९७५ ते १९७७ दरम्यान देखील त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मध्ये ते जनसंघाचे प्रदेश सचिव आणि उपाध्यक्ष होते. जोशी हे निडर आणि धाडसी व्यक्तिमत्व होते. गोरक्षणासाठी देखील त्यांनी लढा दिला होता. १९८० मध्ये भाजपाची स्थापना झाली तेव्हा ते भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पुढे ते पक्षाचे अध्यक्ष झाले. विशेष म्हणजे ते देशाचे गृहमंत्री देखील होते. मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकू शकले. वाजपेयींच्या काळात ते मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून काम करत होते.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ते बनारसमधून जिंकले होते. मात्र मोदींनी पुढे नरेंद्र मोदींसाठी ती जागा सोडली आणि ते कानपूरमधून निवडणूक लढले आणि जिंकले. त्यांचं सर्वात धाडसी आंदोलन म्हणजे, ज्या काळात काश्मीरमध्ये इस्लामी जिहादी आतंकवादाचं राज्य होतं, त्या काळात १९९२ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर अशी ’एकता यात्रा; काढून श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा ध्वज त्यांनी फडकवला, त्यावेळेस नरेंद्र मोदी देखील त्यांच्यासोबत होते. त्यामुळेच जोशी हे भाजपाचे आधारस्तंभ आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.