पोलिसांच्या हातावर तुरी, आरोपीने ‘अशी’ ठोकली धूम!

127

अपहरण आणि हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांना तुरी देत, धूम ठोकल्याची घटना शुक्रवारी, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे घडली आहे. दुर्गाप्रसाद सुखंचद हरिणखेडे असे या आरोपीचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील नवेगाव खैरलांजी येथील रहिवासी आहे.

आरोपीला अटक

यासंदर्भातील माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील बोदा इथल्या शेतात चेतन नरेश खोब्रागडे नामक तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतक चेतनचे अपहरण झाले होते आणि त्याच्या सुटकेसाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. परंतु २२ फेब्रुवारी रोजी चेतनचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मोबाईल नंबरवरून आरोपी दुर्गाप्रसादला अटक करण्यात आली होती.

( हेही वाचा: भारताकडे मदतीचा हात मागणा-या युक्रेनने कधी भारताला मदत केली आहे का? )

शोध सुरु

शुक्रवारी सकाळी दुग्राप्रसाद या आरोपीला शौचालयाला जाण्यासाठी बाहेर काढले असता, त्याने पळ काढला. आरोपीने अशा प्रकारे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याने, परिसरात पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. आरोपी फरार झाल्यानंतर, आता पोलीस सतर्क झाली असून, वेगवेगळ्या टीम तयार करुन पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.