कांदिवलीत धारदार शस्त्रानं हल्ला, तरूणाचा कापला गळा अन्…

120

मुंबईतील कांदिवली परिसरात पुन्हा एकदा हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. कांदिवलीत एका तरूणाची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याने हा परिसर पुन्हा हादरला आहे. सध्या पोलिसांनी या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून याचा तपास देखील सुरू आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी पथकं तैनात केल्याचीही माहिती मिळत आहे. या तरूणावर हल्ला करून मारेकरी फरार झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर हत्या झालेल्या ठिकाणी काही पुरावे मिळतात का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

(हेही वाचा – विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)

मिळालेल्या माहितीनुसार, धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये तरूणाचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरू पळ काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या मागावर आहेत. लवकरच तरूणाच्या मारेकऱ्यांना पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

मुंबईतील कांदिवली पूर्व या ठिकाणी तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी कांदिवली पूर्व पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी तत्काळ पुढील तपासाला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या तपासात फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जाते आहे. तसेच श्वान पथकही तैनात करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.