जांब येथील श्री समर्थांच्या देव्हाऱ्यातील श्रीरामाच्या मूर्ती चोरी प्रकरणात पोलिसांनी शेख जिलानी, शेख हुसेन या दोन मुस्लिम आरोपींना अटक केली. यासंदर्भात घनसावंगी वकील संघाच्यावतीने आरोपींचे कोणत्याही वकील सदस्यांनी वकीलपत्र दाखल करून घेऊ नये, असा ठराव केला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी आरोपींच्या वतीने न्यायालयात खटला लढविण्यासाठी अन्य जिल्ह्यातून वकिलांना यावे लागले.
देवस्थानची बाजू वकील संघटना मोफत लढवणार
१ नोव्हेंबर रोजी घनसावंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस.आर. धायतडक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपींच्यावतीने घनसावंगी न्यायालयातील कोणत्याही वकील सदस्यांनी आरोपींचे वकीलपत्र दाखल करू नये. अशा प्रकारचा ठराव अॅड. शामसुंदर तांगडे यांनी सूचक म्हणून मांडला होता. त्यास अॅड. गजेंद्र तांगडे यांच्यासह सर्व सदस्यांनी सर्व संमतीने पाठींबा दर्शविला. तसेच श्रीराम मंदिर देवस्थान यांच्यावतीने या प्रकरणात न्यायालयीन कामकाजासाठी देवस्थान समितीकडून कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता स्वखर्चाने घनसावंगी वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्य कामकाज करतील, असाही ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला आहे. घनसावंगी वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी अॅड. शामसुंदर तांगडे, अॅड. व्ही.ए. तौर, अॅड. जी.जी. तांगडे, अॅड. वागदरे, अॅड. के.आर. कुलकर्णी, अॅड. एस.जी. देवडे, अॅड.ए.के.माने, अॅड.एस.व्ही. चव्हाण आदींची उपस्थिती होती.
(हेही वाचा अशोक गेहलोत गुलाम नबी आझादांच्या मार्गावर, काँग्रेसला करणार रामराम?)
काय आहे हे प्रकरण?
समर्थ रामदास स्वामींनी ज्या मूर्तींची पूजा केली अशा या सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या मूर्ती होत्या. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत आहे, असे सांगितले जाते. ११ मूर्तींची चोरी करण्यात आली होती. या चोरी प्रकरणी हिंदू धर्मियांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सर्व सूत्रे हलवून आरोपीला अटक केली. त्यामध्ये आरोपी धर्मांध मुस्लिम असल्याचे उघड झाले आहे. यातील मुख्य आरोपी हा शेख जिलानी आणि शेख हुसेन याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ मूर्ती ताब्यात घेतल्या आहेत.
(हेही वाचा श्रीक्षेत्र जांबमधून देवतांच्या मूर्ती चोरणारे आरोपी निघाले धर्मांध मुस्लिम )
Join Our WhatsApp Community