MVA च्या मेळाव्यांची भाऊ गर्दी; आठ दिवसांच्या आत दुसरा मेळावा

184
MVA च्या जागा वाटपात मुंबईत काँग्रेस, उबाठा तोट्यात; तर पवार गट ना नफ्यात ना तोट्यात

विधानसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. यासाठीच सर्व राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात चार्ज करताना दिसून येत आहेत. परंतु यामध्ये महाविकास आघाडीने (MVA) सत्ताधारी पक्षाच्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा” जास्त धसका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच की काय आठ दिवसांच्या आत महाविकास आघाडीकडून त्याच ठिकाणी म्हणजे षण्मुखानंद सभागृहामध्ये दुसरा मेळावा घेण्यात येत आहे.

(हेही वाचा Mamata Banerjee यांनी बलात्कारित पीडितांसाठी बनवले रेट कार्ड; बंगालमधील पीडित डॉक्टरच्या वकिलाचा गंभीर आरोप)

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे. मागच्या आठवड्यातच याच शन्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि पुन्हा आता कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.