भारतातील लिबरल्स लोक अत्यंत संवेदनशील आहेत. देशाबाहेरील व्यक्तीने आपल्याला पटण्यासारखे वक्तव्य केले तर लगेच भावूक होतात आणि त्यांना वाटू लागते की जगात आपल्याला मानणारे लोक आहेत. द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर देशातल्या लिबरल्स लोकांनी टीका केली. अगदी आम आदमी पार्टीचे आयुष्यभराचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी देखील हा चित्रपट खोटा आहे असे वक्तव्य केले. परंतु विवेक अग्निहोत्री यांना जनतेने कौल दिला.
( हेही वाचा : स्टेट बँकेचा ‘तालिबानी’ निर्णय, विरोधानंतर माघार)
इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी इफ्फीमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. लॅपिड यांनी या चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रपोगंडा’ असणारा चित्रपट म्हटले आणि यातून मोठा वाद उभा राहिला. लॅपिड यांच्या विधानामुळे भारतातले लिबरल्स मात्र खुश झाले. इस्रायल सारख्या देशातही आपल्यासारखे सो कॉल्ड लिबरल्स राहतात आणि तेही आपल्यासारखे पुराव्याअभावी वादग्रस्त वक्तव्य करतात, यात भारतातील लिबरल्सना जणू दिव्यानंद वाटला.
आणि आयुष्यात ज्याचं नाव ऐकलं नव्हतं त्या नदाव लॅपिडची तोंडभरुन स्तुती सुरु झाली. तसेच चित्रपटात जे काही दाखवले ते खरे नव्हते हे जर कोणी सिद्ध केले तर चित्रपट बनवणे बंद करेल, असे आव्हान विवेक अग्निहोत्री यांनी दिले आहे. परंतु हे आव्हान लिबरल्स स्वीकारणार नाहीत. कारण एखादी गोष्ट सिद्ध करायला सांगितली की लिबरल्स दोन पावले मागे जातात. आपल्या देशाचं एक सामाजिक दुर्दैव असं की आरोप करणार्याला आरोप सिद्ध करावा लागत नाही, तर ज्याच्यावर आरोप होत आहेत, त्याने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करावे असा लिबरल्स कायदा सांगतो.
म्हणूनच राहुल गांधी काहीही बरळतात, परंतु त्या बरळण्याला काही आधार नसतो, त्यांना ते सिद्धही करता येत नाही. इस्रायल या देशाची सभ्यता पहा, इस्रायलच्या राजदूतांना मध्यस्थी करावी लागली आणि राजदूत कोब्बी शोशानी यांनी लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. इस्रायल हा भारताचा मित्र आहे आणि दर वेळी आपली मैत्री निभावण्यात इस्रायल मागे पुढे पाहत नाही.
द काश्मीर फाईल्म्स या चित्रपटात दाखवलेलं सत्य पाहून भारतीयांचं मन हळहळले. कॉंग्रेस संस्कृतीने आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं होतं, याची जाणीव देशवासियांना झाली. भारताची फाळणी झाली तेव्हा हिंदुंवर अनन्वित अत्याचार झाले, स्त्रियांवर बलात्कार झाले, कत्तली झाल्या आणि दुसरीकडे नेहरु सफेद कबुतर उडवून शांतीचा संदेश देत होते. ज्या माणासाला स्वतःच्याच देशात शांतता प्रस्थापित करता आली नाही. पंतप्रधान होण्यासाठी हिंदूंच्या प्रेतावरुन चाल करण्याची पाळी आली, ती व्यक्ती जगाचा शांततेचे डोस पाजते. हे सत्य देखील भारतीयांपासून लपवून ठेवलं होतं. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरचं सत्य बाहेर आणलं, आता लवकरच फाळणीचं सत्य देखील बाहेर येईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की व्याख्यानाने जो प्रभाव पडत नाही, तो एका नाटकाने पडतो. आता चित्रपट व वेब सीरिजचं युग आहे. चित्रपटाचा प्रभाव लोकांच्या मनावर पडतो. म्हणूनच लिबरल्स लोक द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला घाबरले आहेत. कारण या चित्रपटाने हिंदूंना अतिरेकी संस्कृती विरोधात एकत्र आणलं आहे. लिबरल्स यांचा अजेंडा या चित्रपटाने खोडून पाडला आहे. नदाव लॅपिडच्या विधानामुळे लिबरल्स सुखावले असले तरी आता या चित्रपटाची किर्ती वाढत जाणार आहे.
Join Our WhatsApp Community