धक्कादायक! गेल्या दोन वर्षांत १२० कैदी फरार

149

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 2020 ते 2022 या कालावधीत पेरोलवर सोडण्यात आलेल्या 493 कैद्यांपैकी फक्त 373 कैदी परत आले. यापैकी 120 कैदी ‘रफूचक्कर’ झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत.

जानेवारी 2020 ते मे 2022 या कालावधीत किती कैद्यांना पेरोल मंजूर झाला व किती कैदी परत आले. किती कैद्यांचा या कालावधीत मृत्यू झाला इत्यादी माहिती, माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे विचारणा केली होती. या काळात कारागृहात 9 हजार 155 नवीन कैदी आले, तर 8 हजार 461 कैद्यांना जामीन मिळाला किंवा त्यांची सुटका झाली.

मागिल 29 महिन्यांत नागपूर मध्यवर्ती कारागृहात 15 कैद्यांचा मृत्यू झाला. विविध कारणांमुळे हे मृत्यू झाले असले तरी नातेवाईकांकडून विविध दोषारोपदेखील करण्यात आले होते. तीनच वर्षांत कारागृहातील कैद्यांवरील खर्चात 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये कैद्यांवर 2 कोटी 51 लाख 63 हजार 780 रुपये खर्च झाले होते. 2020-21 मध्ये हा आकडा 3 कोटी 11 लाख 50 हजार 812 वर गेला. तर 2021-22 मध्ये खर्चाचा आकडा सर्वाधिक 4 कोटी 24 लाख 99 हजार इतका होता.

मे 2022 पर्यंत बंदीस्त असलेले बंदी

  • विदेशी बंदी 04
  • चौकशी अधिन बंदी 991
  • 302 न्यायाधिन बंदी 563
  • एमपीडीएबंदी 18
  • सश्रम कारावास शिक्षाबंदी 347
  • एनडीपीएस शिक्षाबंदी 23
  • जन्मठेप शिक्षाबंदी 420
  • मृत्यूदंड शिक्षाबंदी 08
  • एनडीपीएस न्यायाधिन बंदी 126
  • लालपट्टी (भगोडा) बंदी 30
  • मोका न्यायाधिन बंदी 162
  • नक्षलवादी बंदी 77
  • रात्रपहारेकरी 19
  • सिद्धदोष अन्वेक्षक (वॉर्डर)13
  • खुले कारागृह शिक्षाबंदी 29

एकूण बंदीसंख्या -2830

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.