नागपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

187

भंडा-यात महिलेवर अत्याचार करणा-या दोन आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभार असून, सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: शिंदेंचे बंड झाले नसते तर, यात्रा काढली असती का? अमित ठाकरेंची आदित्य ठाकरेंवर टीका )

चित्रा वाघ पीडितेच्या भेटीला

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची भेट घेऊन रुग्णालय प्रशासनासोबत तिच्या प्रकृती संदर्भात बोलण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत संवाद साधून पीडितेच्या आरोग्याबाबत विचारपूस केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.