उन्हाळी सुट्टीसाठी नागपूर-मडगाव-नागपूर विशेष एक्स्प्रेस सुरू

165

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली आहे. ही साप्ताहिक गाडी येत्या १२ जूनपर्यंत धावणार आहे.

विशेष एक्स्प्रेस पूर्णपणे आरक्षित असणार

०१२०१ क्रमांकाची गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी दुपारी १५.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी मडगाव येथे सायंकाळी १७.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ०१२०२ क्रमांकाची विशेष गाडी दर रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री २०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

(हेही वाचा -Uber नंतर आता Ola नेही वाढवले भाडे, ‘या’ शहरांतील प्रवास महागला!)

ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकांवर थांबणार आहे. गाडीत रेल्वे सेकंड सीटिंग, वातानुकूलित द्वितीय, तृतीय वर्ग, वातानुकूलित वर्ग, शयनयान असेल. गाडी पूर्णपणे आरक्षित असणार आहे.

कायमस्वरूपी गाडी सुरू करण्याची मागणी

ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर श्रीमती ॠचा खरे यांच्याकडे केली आहे. सध्या सुरू झालेल्या हंगामी गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.