आरआरबी परीक्षेच्या उमेदवारांना प्रवास करणे सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेकडून नागपूर आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
( हेही वाचा : Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ९२ हजारांहून अधिक पदांची बंपर भरती)
विशेष गाडी
- 01063 ही विशेष गाडी नागपूर येथून दिनांक १२ जून २०२२ रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल आणि दिनांक १४ जून २०२२ रोजी ०१.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
- 01064 ही विशेष गाडी दिनांक १५ जून २०२२ रोजी मडगाव येथून १५.०० वाजता सुटेल आणि दिनांक १६ जून २०२२ रोजी २०.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
- थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन, पुणे, सातारा, मिरज, बेळगावी, लोंडा.
- संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी चेअर कार, २ ब्रेक व्हॅनसह १२ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण सुविधा
या दोन्ही विशेष गाड्यांचे बुकिंग दिनांक ११ जून २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. ४ द्वितीय आसन श्रेणी आणि २ ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी अनारक्षित कोच म्हणून चालविण्यात येतील
Join Our WhatsApp Community