RRB परीक्षेसाठी नागपूर – मडगाव विशेष ट्रेन

120

आरआरबी परीक्षेच्या उमेदवारांना प्रवास करणे सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेकडून नागपूर आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.

( हेही वाचा : Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ९२ हजारांहून अधिक पदांची बंपर भरती)

विशेष गाडी 

  • 01063 ही विशेष गाडी नागपूर येथून दिनांक १२ जून २०२२ रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल आणि दिनांक १४ जून २०२२ रोजी ०१.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
  • 01064 ही विशेष गाडी दिनांक १५ जून २०२२ रोजी मडगाव येथून १५.०० वाजता सुटेल आणि दिनांक १६ जून २०२२ रोजी २०.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन, पुणे, सातारा, मिरज, बेळगावी, लोंडा.
  • संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी चेअर कार, २ ब्रेक व्हॅनसह १२ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण सुविधा 

या दोन्ही विशेष गाड्यांचे बुकिंग दिनांक ११ जून २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. ४ द्वितीय आसन श्रेणी आणि २ ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी अनारक्षित कोच म्हणून चालविण्यात येतील

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.