राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणारा समुद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बुस्टर डोस समजला जात आहे. नागपूर ते मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवान पद्धतीने सुरू आहे. तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर डिसेंबरपासून वाहतूक सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र या महामार्गाचे अनेक कामे अद्याप शिल्लक आहेत. दुसरीकडे हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या एमएसआरडीसीने यासंदर्भात कुठलीही नवीन डेडलाईन निश्चित केलेली नाही. परंतु शिल्लक असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
असा असेल समृद्धी महामार्ग
700 किलोमीटर अंतरापैकी 112 किमी लांबीचा रस्ता औरंगाबादमधून जातो इतकेच नाही तर त्याची रूंदी 120 मीटर असणार आहे. याच मार्गावरील पोखरी शिवारात सध्या काळ्या पाषाणाचा खडक फोडून मोठा बोगदा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बोगद्यात ग्राउटिंग आणि गनायटिंग अशी केमिकल ट्रिटमेंट केलेली आहे. या ट्रीटमेंटमुळे ढिसाळ झालेला खडक मजबूत शिवाय वॉटरप्रूफिंगदेखील केला जातो.
(हेही वाचा –‘बुली बाई’ अॅप प्रकरणी पहिला आरोपी ताब्यात, मुंबई पोलीस सायबर सेलची कारवाई)
- या बोगद्याची लांबी 301 फूट असून 17.5 मीटर रुंदी आहे. तर बोगद्याची उंची 17.5 फूट इतकी आहे.
- नागपूर ते मुंबई या एकूण 701 किलोमीटर रस्त्यावर 26 टोलनाके असणार आहेत.
- 26 टोलनाक्यांवर सुमारे 624 कर्मचारी टोल वसुलीसाठी कार्यरत असतील
- कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जाणार
- नागपूर ते मुंबई असा कारने प्रवास केला तर महामार्गावर सुमारे 1 हजार 213 टोल द्यावा लागणार