पिपंरी चिंचवडमध्ये दहा, मुंबईत चार, पुण्यात एक आणि डोंबिवलीमध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्येही शिरकाव केला आहे. यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ओमायक्रॉनची दहशत वाढली असून ती कायम आहे. यासंदर्भातील माहिती नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी दिली.
पश्चिम आफ्रिकेतून नागपूरात दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये ४० वर्षाच्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली. ओमाक्रॉनची बाधा झालेला व्यक्ती पश्चिम आफ्रिकेतून प्रवास करून आला आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रोची बाधा झाल्याचे समोर आले. या रूग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
(हेही वाचा- तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव)
Nagpur reports its first case of #Omicron in a 40-year-old man: Municipal Commissioner Radhakrishnan B
— ANI (@ANI) December 12, 2021
संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग होणार
या रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात आहे. त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जिनोम सिक्वेन्सिंग त्याला ओमायक्रॉन असल्याचे निदान झाले आहे.
Join Our WhatsApp Community