नागपुरात स्कूल व्हॅनचा मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात झाला तेव्हा विद्यार्थी असलेली ही व्हॅन नाल्यात पडली. मात्र सुदैवाने या व्हॅनमधील विद्यार्थी बचावले असून ते सर्व बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्याजवळ या व्हॅनचा अपघात झाला. यावेळी ही व्हॅन नाल्याच्या कठड्यावर आदळली यामध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाले असून बाकी सर्व सुखरूप आहेत.
(हेही वाचा – संजय राऊत यांच्या कुटुंबाला शरद पवार विसरले!)
या अपघातानंतर सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कारवाई करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्कुल व्हॅनचं स्टेअरींग लॉक झाल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. घडलेल्या या अपघातामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. अपघाताच्या भीतीमुळे तेथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल न घेतल्याने पुन्हा या ठिकाणीच हा अपघात झाला आहे. या व्हॅनमध्ये एकूण २१ विद्यार्थी होते यापैकी १६ विद्यार्थ्यांना बचावण्यात आले आहे. यामधील १४ विद्यार्थ्यांना स्थानिकांनीच सुरक्षित बाहेर काढले, त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले.
Join Our WhatsApp Community