प्रेयसीला धावत्या गाडीवर केली मारहाण! व्हिडिओ व्हायरल

80

आपली प्रेयसी इतरांसोबत बोलते म्हणून पझेसिव्ह होणारे अनेक दिलजले आशिक आपण पाहिले असतील. पण या कारणावरुन आपल्या प्रेयसीला मारहाण करणा-या एका हैवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नागपुरात ही घटना घडली असून, नागपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मारहाण करत शिवीगाळ

19 वर्षीय समीर खान सलिम खान याने आपला मित्र शकिन सिद्दीकी याच्यासोबत आपल्या 17 वर्षीय प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर धावत्या बाईकवर तिला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ करुन तो आपल्या सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओत तरुणीला मारहाणी सोबतच शिवीगाळ सुद्धा करण्यात आली आहे.

https://youtu.be/694pfsZT9iA

काय आहे प्रकरण?

17 वर्षीय तरुणी आणि 19 वर्षीय समीर खान यांचे 2019 पासून प्रेमसंबंध होते. टिक-टॉक व्हिडिओच्या माध्यमातून या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे. या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले असल्याची माहितीही एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. आपली प्रेयसी इतर मित्रांशी बोलते या रागातून, 18 जून रोजी समीर खान याने तरुणीला जबरदस्ती बाईकवर बसवले. शकिन सिद्दीकी या आपल्या मित्रासोबत गाडीवर त्याने या तरुणीला मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने तिथून पळ काढल्याने तिचे प्राण वाचले, अशी माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे.

दोघांवर गुन्हे दाखल

स्थानिकांनी या प्रकाराबाबत नागपूर शहर पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी समीर आणि शकिन यांचा शोध घेत त्यांना अटक केली. आयपीसीच्या पॉक्सो कायद्यांतर्गत या दोघांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.