Vaibhav Raut : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपी वैभव राऊत यांना जामीन मंजूर

364
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत (Vaibhav Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पाच वर्षांपूर्वी एटीएसने (ATS) वैभव राऊत यांना नालासोपारा येथून अटक केली होती. वैभव राऊत यांच्या घरातून स्फोटक पदार्थ सापडल्याचा दावा एटीएसने केला होता.

 

जानेवारी 2023 मध्ये वैभव राऊत (Vaibhav Raut) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणातील अनेक सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणातील खटला सध्या सुरू असून तो लवकर संपण्याची काहीही शक्यता नाही. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती वैभव राऊत (Vaibhav Raut) यांनी आपल्या जामीन अर्जात केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. न्यायालायने ही याचिका स्वीकारत जामीन मंजूर करताना वैभव राऊत यांना खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी आणि साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी तपासयंत्रणेने डिसेंबर 2018 मध्ये 6 हजार 842 पानांचे पहिले दोषारोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात सादर केले होते. ज्यात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांगरकर, अविनाश पवार यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश होता. या सर्वांवर युएपीए, शस्त्रसाठा प्रतिबंधक कायदा, विस्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसीच्या गंभीर कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.