नलिनीधर भट्टाचार्य (Nalinidhar Bhattacharya) हे आसाममधील कवी आणि साहित्याचे समीक्षक होते. आसामी साहित्यातील जयंती काळातील सर्वोत्कृष्ट कवींमध्ये त्यांची गणना होते. ते सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बिरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचे मोठे बंधू होते.
नलिनीधर भट्टाचार्य यांना देखील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. भट्टाचार्य यांनी १९४० मध्ये कोकाजन हायस्कूल, जोरहाट येथून १० वी परीक्षा उत्तीर्ण केली. १९४२ मध्ये जोरजाटच्या जे.बी. कॉलेजमधून ते १२ वी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी बीए करण्याचा विचार केला. त्यानंतर आसामीमध्ये मास्टर्स केले.
(हेही वाचा-Sheikh Maharaj Sher Singh : जिहादच्या विरोधात उभे राहणारे शीख महाराज शेर सिंह)
त्यांनी कोकाजन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे १९६० ते १९६३ या काळात शिलाँगच्या सेंट अँटोनी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आर्य विद्यापीठ महाविद्यालय लेक्चरर म्हणून काम केले. भट्टाचार्य यांच्या अनेक कविता लिहिल्या. त्यांचे सेरासालीर मालिता, नोनी आसेनए घोरोत, मोहोत ओइतिज्यो इ. साहित्य प्रकाशित झाले आहे.
आये कुवोलिते, सर्सालीर मालिता, आहोत खोपून, नोनी आसओने घोरोत आणि बिदाय फुलोर दिन हे काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत. २००२ मध्ये त्यांना मोहोत ओइतिज्योसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिपू आसाम साहित्य सभा कवि संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community