देशातील सर्वाधित वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी (CSMT) स्थानकाला २० जून २०२२ रोजी १३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील एक ऐतिहासिक व सर्वात मोठी रेल्वे स्थानक आहे. सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबतच मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. १८७८ मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरूवात झाली. या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते. परंतु तुम्हाला माहिती आहे या सीएसएमटी स्थानकाच्या नावात तब्बल चार वेळा बदल करण्यात आला आहे.
चार वेळा बदलले नाव
इंग्रजांनी जेव्हा भारतात रेल्वे सुरू केली. तेव्हा सीएसएमटी या स्थानकाचे नाव बोरीबंदर असे होते. हा परिसर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेच्या ताब्यात होते. १८८७ साली महाराणी व्हिक्टोरिया यांच्या कार्यकाळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याने या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे ठेवण्यात आले होते.
१९९६ मध्ये रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांनी या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे ठेवले त्यानंतर २०१७ मध्ये जून महिन्यात या स्थानकाच्या नावात बदल करण्यात आला. या स्थानकाच्या नावामध्ये महाराज हा शब्द जोडण्यात आल्यानंतर हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाऊ लागले.
सीएसएमटी (CSMT) स्थानकाविषयी…
सीएसएमटी स्थानकावर १८ फलाट आहेत.
महाराष्ट्राच्या सातव्या आश्चर्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली होती. यामध्ये सीएसएमटी स्थानकाचा समावेश आहे. तसेच सीएसएमटी हे UNESCO चे जागतिक वारसा स्थान आहे.
२००८ मध्ये झालेल्या २६/११ हल्ल्यांमध्ये या सीएसएमटी स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
स्लमडॉग मिलेनियर ऑस्कर विजेत्या सिनेमातील जय हो हे गाणे सीएसएमटी स्थानकावर चित्रित करण्यात आले आहे. तसेच रावन या चित्रपटातही हे स्थानक दाखवण्यात आले आहे.
मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक या स्थानकामध्ये संग्रहालय असून येथे या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community