९८व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव; पंतप्रधानांच्या भाषणातही तीन वेळा Veer Savarkar यांचा उल्लेख 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मराठी भाषेत फार मोठे योगदान आहे.

36

दिल्लीमध्ये ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम येथे सुरु आहे. या संमेलनाच्या तीन  प्रवेशद्वारापैकी एका प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे नाव देण्यात आल्यामुळे सावरकरप्रेमींमध्ये (Veer Savarkar) आनंदाचे वातावरण आहे. साहित्यनगरीत जमलेल्या सावरकरप्रेमींनी याविषयी समाधान व्यक्त केले. उदघाट्नच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही वीर सावरकर यांचा तीन वेळा उल्लेख झाला.

साहित्य संघ पुणे दक्षिणचे सदस्य सुधाकर मालती कृष्णाजी वाघ म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बहुमान मिळाला याचा आनंद आहे. पंतप्रधान मोदी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याप्रती असलेल्या आस्थेमुळे हा बदल होत आहे. खरं तर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळायला हवा. त्या क्षणाची आम्ही वाट बघतोय. काही लोकांनी वीर सावरकर यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरवले आहेत. ते दूर व्हायला हवेत. लोकांना खरे सावरकर (Veer Savarkar) कळायला हवेत. ते आमच्यासाठी क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. त्यांच्या पात्रतेला योग्य न्याय मिळायलाच हवा. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला वीर सावरकरांचे नाव दिले याचा मनस्वी आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ समाजाचे कोषध्यक्ष आणि कवी एकनाथ हडप म्हणाले की, साहित्य संमेलनामध्ये प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नाव बघताच अभिमानाने छाती भरून आली. सावरकरांवर प्रचंड श्रद्धा आहे. नाशिक येथील भुगूरच्या वाड्याचेही खूप छान प्रकारे जतन होत आहे.

(हेही वाचा नाशिकमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे प्रशासनाने २५ वर्षांपूर्वीचा अनधिकृत Dargah केला जमीनदोस्त)

कवी डॉ. वैभव अंभोरे म्हणाले की, हे प्रवेशद्वार बघून आनंद आणि अभिमान दोन्ही वाटत आहे. तर कल्याणवरून साहित्य संमेलनासाठी आलेले कवी धनंजय मधुकर गोरे म्हणाले की, खास स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या प्रेमापोटी अंदमानला जाऊन आलो आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांना मिळालेला सन्मान पाहून आनंद झाला. तर पौर्णिमा गोरे यांनी देखील साहित्य संमेलनात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रवेशद्वाराबद्दल आनंद व्यक्त केला. एकूणच संमेलनस्थळी सावरकर प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वीर सावरकरांचे मराठी भाषेसाठी मोठे योगदान – पंतप्रधान मोदी 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भाषणात तीन वेळा केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मराठी भाषेत फार मोठे योगदान आहे. ते योगदान कुणीच नाकारू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यासारखी थोर व्यक्ती देशाला लाभल्यामुळे त्यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.