वाळू माफियांवर धाडसी कारवाई; मांजरा नदी पात्रात धाडसत्र, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

102

वाळू उपसा अवैध पद्धतीने सर्रास केला जातो. त्यामुळे आता या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना विभाजित करणा-या मांजरा नदीच्या पात्रातून नेहमीच भरपूर वाळू उपसा केला जातो. त्यामुळे आता महसूल विभागाकडून मिळालेल्या परवानगी व्यतिरिक्त लाखो ब्रास वाळू उपसा या ठिकाणाहून केला जातो. मांजरा नदीच्या पात्रातून 38 वाहने आणि पाच पोकलेन असे कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त करुन एक मोठी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर वाहन चालक, ठेकेदार सहाय्यक यांना पळता भूई थोडी झाली होती.

तरीही अवैध वाळू उपसा सुरुच

तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला विभाजित करणा-या नांदेड जिल्ह्यातील बुलोली येथील मांजरा नदीच्या पात्रातून महसूल विभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त जास्तीचा वाळू उपसा होतो. त्यामुळे या दोन राज्यांना विभाजित करणा-या मांजरी नदीच्या पात्रातून होणारा वाळू उपशावर कानाडोळा केला जातो,असा स्थानिकांनी आरोप केला आहे. या नदीपात्रातून होणा-या अवैध वाळू उपशासाठी असंख्य निवेदने, उपोषणे अनेक वेळा देण्यात आली आहेत. तरी पण अवैध वाळू उपसा सुरुच आहे.

( हेही वाचा: मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना, 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू )

मागच्या तीन-चार वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई

सोमवारी पहाट होण्याआधीच सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या सहका-यांनी मांजरा नदीपात्रात धाड टाकली. अचानकपणे पोलिसांनी टाकलेल्या धाडीने मांजरा नदी पात्रात अवैध रेती उपसा करणारे रेती माफियांनी रेती उपसा करणारी वाहने जागेवरच ठेऊन पळ काढला. अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणावरुन वाळूने भरलेले 38 टिप्पर आणि 5 वाळू उपसा करणारे पोकलेन, असे करोडो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालय बिलोली आणि मोटार परिवहन विभागाला देण्यात आला आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत मांजरा नदीच्या अवैध वाळू उपशावर ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे मानले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.