धक्कादायक! स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून जोडप्याची आत्महत्या

लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने, प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव येथे घडलाआहे. सदर प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तामशाजवळील वडगाव शिवारात सोमवारी पहाटे ही घटना घडल्याचं समोर आलं. या जोडप्याने मोबाईलवर स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

भीतीपोटी टोकाचे पाऊल

तामसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शेषेकांत रामराव पाटील (वय २४) आणि तरुणीचे नाव शिवानी केशव हरण (वय २२) असे आहे. दोघांनी वडगाव शिवारात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. प्रेमी युगुल हे एकाच गावातील आणि एकाच समाजातील होते. विवाहाला घरचे मान्यता देणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा वडगाव परिसरात आहे.

( हेही वाचा :शासनाची फसवणूक करुन दरेकर मध्यवर्ती ‘मुंबै बॅंके’चे बनले संचालक )

एकाच चितेवर अंत्यसंस्कार

‘आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा’ असा स्टेटस ठेवल्याने  शेषकांत याच्या मित्रांनी त्या दोघांना फोन केला, पण दोघांनीही फोन न उचलल्याने मित्रांनी शेषकांतच्या वडिलांना फोन केल. मित्र आणि कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर दोघांचेही मृतदेह शिवारात आढळले. तामसा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगीरे यांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. यानंतर दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here