शीख कट्टरतावाद आणि मंदिरांवरील हल्ल्यांची मोदी सरकारने घेतली दखल, ब्रिटन-कॅनडाला प्रत्युत्तर द्यायला तयार

134

गेल्या काही दिवसांपासून ब्रिटन आणि कॅनडातील काही भागांमध्ये शीख कट्टरतावादी संघटनांकडून हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल आता केंद्रातील मोदी सरकारने घेतली असून भारतानेही या विरोधात प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असल्याची माहिती मिळत आहे.

इंग्लंडमध्ये लीसेस्टरनंतर स्मेथविकमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणावर शीख कट्टरतावादी जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या प्रकारच्या घटना घडल्या असून मोदी सरकारने ब्रिटन आणि कॅनडावर आपले बारीक लक्ष ठेवले आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी मोदीं सरकारकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः मेडिकल कॉलेजच्या नियमांत बदल,आता एक हजार खाटा असणे आवश्यक)

ब्रिटन सरकारची डोळेझाक

इंग्लंडमधील लिसेस्टर येथे भारतीय समुदायाच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनाबाबत भारत सरकारने ब्रिटीश सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शीख कट्टरतावादी संघटनांकडून फुटीरतावादी दृष्टीकोनातून उभारल्या जाणा-या निधीकडे ब्रिटीश एजन्सी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे भारत सरकारच्या निदर्शनास आले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे समजत आहे.

शिख फॉर जस्टिसच्या कारवाया

शिख फॉर जस्टिस या शीख कट्टरतावादी संघटनेकडून अनेक कारवाया करण्यात येत असल्याच्या घटना घडल्या आहेत. 19 सप्टेंबर रोजी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे या संघटनेच्या वतीने सार्वमत घेण्यात आले होते. कॅनडातील टोरंटो येथील स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर कट्टरतावाद्यांनी घोषणा देत भित्तिचित्रे बनवण्यात आली होती. यामुळे तेथील संतप्त भारतीयांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला होता. पण कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.