अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदींनही (Narendra Modi) ११ दिवस अनुष्ठान केले आहे. यावेळी महत्त्वाच्या धार्मिक विधी सुरू आहेत. त्यासाठी मोदी ‘यमनियमांचे पालन’ही करत आहेत.
जमिनीवर झोपणे, नारळाचे पाणी पिणे
११ दिवस पंतप्रधान मोदी अनुष्ठान करत असल्यामुळे ते जमिनीवर झोपतात तसेच ते फक्त नारळाचे पाणी पित आहेत, अशी माहिती राम मंदिरातील सूत्रांनी गुरुवारी दिली आहे. त्यांचे हे विशेष अनुष्ठान १२ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.
(हेही पहा –Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले कायदेशीर लढा उभा करायचा असेल, तर… )
११ दिवसांचा विशेष धार्मिक उपक्रम
गुरुवारी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेच्या (pran pratishtha) ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता आले, हे मी माझे भाग्य समजतो. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने माझी निवड केली. यामुळे ते स्वत:ला भाग्यवान समजत आहेत. यामुळे ११ दिवसांचा विशेष धार्मिक उपक्रम हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कठोर तपश्चर्या आणि उपवास…
याबाबत राम मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी ११ दिवस ‘यम नियम’ पाळतील. शास्त्रांमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. योग, ध्यान आणि शिस्त यासह अनेक कठोर यमनियमांचे ते पालन करणार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी त्यांच्या दैनंदिन जीवनात सूर्योदयापूर्वी उठणे, ध्यान करणे आणि फक्त सात्त्विक अन्न खाणे यासह अनेक यमनियमांचे ते पूर्वीपासून पालन करत आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त त्यांनी ११ दिवस कठोर तपश्चर्या आणि उपवास करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –