पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांचा नाशिकमध्ये भव्य रोड शो झाला. त्यात हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला.
शानदार रोड शो पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट रामकुंडावर पोहचले. रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. रामकुंडावर गोदावरीचे जलपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पोहचले. याठिकाणी पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिराला फेरीही मारली. यानंतर मोदींच्या हस्ते श्री काळारामाची आरती व पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य महंत सुधीरदास पुजारी यांनी केले. यावेळी नरेंद्र मोदी हे भजनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – Ind vs Afg 1st T20 : मोहालीच्या थंडीत अक्षर, शुभमन आणि कुलदीपची ‘अशी’ झाली फजिती)
मोदींच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व
काळाराम मंदिरातील पूजाविधी आटोपल्यानंतर, पंतप्रधान मोदी हे २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. या ठिकाणी त्यांनी युवकांना संबोधित केले. २२ जानेवारीला अयोद्धेत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच याच दरम्यान त्यांनी प्रभु रामचंद्राचे वास्तव्य असलेल्या नाशिकमधील पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन आरतीदेखील केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community