मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हेनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक नेत्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या रेटिंगसह अव्वल ठरले आहेत. तर मॅक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर ६३ टक्क्यांसह दुसऱ्या आणि इटलीचे पंतप्रधान मारियो दाघ्री ५४ टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
यादीत २२ नेत्यांचा समावेश
एकूण २२ जागतिक नेत्यांचा समावेश असलेल्या या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे ४१ टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. बायडन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांना ३९ टक्के आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ३८ टक्के रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सध्या ऑस्ट्रेलिया ,ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मेक्सिको, नेदरलँड्स , दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि युनायटेड स्टेट्स मधील नेत्यांच्या रेटिंग आणि देशाच्या प्रगतीचा अभ्यास करते. यापूर्वी, जानेवारी २०२२ आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. दुसरीकडे, हे व्यासपीठ राजकीय निवडणुका, निवडून आलेले नेते आणि मतदानाच्या मुद्द्यांवर रिअल-टाइम मतदान डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट दररोज २० हजारांहून अधिक जागतिक मुलाखती घेते. ग्लोबल लीडर आणि कंट्री ट्रॅजेक्टोरी डेटा दिलेल्या देशातील सर्व प्रौढांच्या सात दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजवर आधारित आहे.
Join Our WhatsApp Community