Chandrayan 3 : नासाकडून कौतुक; भारत जगातील चौथा देश बनल्याची कबुली

ऐतिहासिक यशानंतर देशवासियांचा जल्लोष !

215
Chandrayan 3 : नासाकडून कौतुक; भारत जगातील चौथा देश बनल्याची कबुली
Chandrayan 3 : नासाकडून कौतुक; भारत जगातील चौथा देश बनल्याची कबुली

चंद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगच्या क्षणाचे इस्रोकडून थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर देश-विदेशातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ही मोहीम यशस्वी होण्याकरता अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपिअन स्पेस एजन्सी (ईएसए) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनीही इस्रोचे अभिनंदन केले आहे.

नासाकडून अभिनंदन 
अभिनंदन इस्रो ! तुमच्या यशस्वी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी ! आणि चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे सॉफ्ट-लँड करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन ! या मोहिमेमध्ये तुमचा भागीदार बनल्याने आम्हाला आनंद होत आहे !, असे नासाने म्हटले आहे.

(हेही वाचा – Leveling Of Potholes : श्री गणेश मूर्ती आगमन–विसर्जन मार्गांवरील खड्डयांच्या समतलीकरणाला प्राधान्य)

युरोपिअन स्पेस एजन्सीकडून कौतुक 

ऐतिहासिक, असे युरोपिअन स्पेस एजन्सीने म्हटले आहे.

देशभरात उत्साह 

देशवासीय ज्या ज्या ठिकाणी होते, तेथे आपापल्या ठिकाणी ते प्रक्षेपण पाहत होते. सॉफ्ट लँडिंग होताक्षणी काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले, काही ठिकाणी ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. सामाजिक माध्यमांवर चंद्रयानच्या यशानंतर देशाविषयी अभिमान व्यक्त करणारे मेसेज केले जात आहेत. मुंबई लोकलमध्येही प्रक्षेपण झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांचे ट्विट

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून इस्रोचे अभिनंदन केले आहे.

मुंबई पोलिसांचे ट्वीट

मुंबई पोलिसांनी एक खास ट्वीट करून इस्रोचे कौतुक केले आहे. यामध्ये चंद्राच्या प्रतिमा दाखवण्यात आल्या आहेत आणि सर्वात शेवटी तिरंगा दाखवण्यात आला आहे.

India’s Phase Will Never Fade!#Chandrayaan3#MissionMoonSuccessful pic.twitter.com/Zv5wXrxoRs

— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) August 23, 2023

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.