NASA astronaut Frank Rubio : नासाचा अंतराळवीर फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला; 371 दिवस अंतराळात रहाण्याचा विक्रम

134
NASA astronaut Frank Rubio : नासाचा अंतराळवीर फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला; 371 दिवस अंतराळात रहाण्याचा विक्रम
NASA astronaut Frank Rubio : नासाचा अंतराळवीर फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला; 371 दिवस अंतराळात रहाण्याचा विक्रम

नासाचे अंतराळवीर फ्रॅंक रुबिओने 371 दिवस अंतराळात रहाण्याचा विक्रम रचला आहे. (NASA astronaut Frank Rubio) फ्रॅंक रुबिओसह एकूण 3 अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीवर परतले आहेत. रॉस्कॉस्मॉसचे सोयूज स्पेस कॅप्सुलच्या (Soyuz MS-23 spacecraft) मदतीने यांचे पृथ्वीवर लँंडिग करण्यात आले. तिघांनी अंतराळात 157.4 दशलक्ष मैलांचा, तर पृथ्वीच्या कक्षेपासून 5,963 ऑर्बिट इतका प्रवास केला आहे. सर्वांत जास्त वेळ अंतराळात पाहून फ्रॅंकने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. (NASA astronaut Frank Rubio)

(हेही वाचा – Tuljapur Solapur Highway Closed : तुळजापूर-सोलापूर महामार्ग तीन दिवस बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती)

फ्रॅंक रुबिओ 21 सप्टेंबर 2022 रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहचला होता. रुबिओ आणि त्याच्या क्रू मेट्सचे मार्च 2023 मध्ये पृथ्वीवर परतणार होते. त्यांना परत आणण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या Soyuz MS-22 अंतराळ यानामध्ये कूलंट लीक झाल्यामुळे ही मोहिम रद्द झाली आणि ५ महिन्यांपेक्षा जास्त वेळ लांबणीवर पडली.

ऑर्बिटरमध्ये 371 दिवस रहाण्याचा विक्रम

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील 69 व्या टीमचे फ्रॅंक रुबिओ सदस्य आहेत. फ्रॅंक रुबिओने पृथ्वीच्या ऑर्बिटरमध्ये 371 दिवस रहाण्याचा विक्रम नोंद केला आहे. यापूर्वी सर्वाधिक वेळ अंतराळात रहाण्याचा विक्रम नासा अंतराळवीर मार्क हेई याच्या नावावर होता. मार्क हेई 355 दिवस अंतराळात होता. 2022 चा हा विक्रम फ्रॅंक रुबिओने मोडला आहे. (NASA astronaut Frank Rubio)

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून अनडॉकिंग केल्यानंतर ३ तासांनंतर डझेझकाझगन शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या कझाकस्तानच्या वाळवंटात त्यांचे पॅरशूट उतरले. लँडिंगनंतर फ्रॅंक रुबिओसह तीनही अंतराळवीरांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. यानंतर कारागांडा, कझाकस्तान येथे नेऊन नासाच्या विमानाने अमेरिकेत नेण्यात आले. फ्रॅंक रुबिओसह, सेर्गेई प्रोकोपिएव्ह आणि डिमिट्री पेटेलिन हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. फ्रॅंक रुबिओ हा नासाचा अंतराळवीर आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर मानवी मोहिम राबवताना मानवी शरीर स्पेसफ्लाईटशी कशा पद्धतीने जुळवून घेऊ शकते, यावर फ्रॅंकने संशोधन केले. (NASA astronaut Frank Rubio)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.