नासाचे DART Mission यशस्वी; भविष्यात पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी लघूग्रहावर धडकले अंतराळयान

125

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पृथ्वीचे भविष्यातील धोक्यांपासून रक्षण होण्यास मदत मिळू शकते. नासाने प्रथमच प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट म्हणजेच डार्ट मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यानंतर पृथ्वीवर एखाद्या लघुग्रहांचा हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली, तर या तंत्राच्या मदतीने पृथ्वीचा बचाव करणे शक्य होणार आहे. कारण भविष्यात या लघुग्रहांपासून पृथ्वीला सर्वाधिक धोका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

27 सप्टेंबरला सकाळी सुमारे 4 वाजून 45 मिनिटांवर सुमारास डार्ट मिशनची टक्कर डीडीमाॅस या लघुग्रहाच्या चंद्रासारखा दगड डिमाॅर्फोसशी झाली. अशाप्रकारे हे मिशन पूर्ण झाले. हे अंतराळयान लघुग्रहावर आदळले आणि या लघुग्रहाची दिशा बदलली. मात्र ते कोणत्या दिशेने वळले आहे, हे डेटा आल्यानंतर समजू शकते. जर डिमाॅर्फोसने आपली कक्षा आणि दिशा बदलली तर भविष्यात पृथ्वीला अवकाशातून आपल्याजवळ येणारा असा कोणताही धोका नसेल. जेव्हा डार्ट मोहिमेचे अंतराळयान डिमाॅर्फोसला धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी 22 हजार 530 किलोमीटर होता.

( हेही वाचा: बाळासाहेबांची सावली शिंदेंची झाली; चंपासिंह थापा यांच्या शिंदे गट प्रवेशाचा काय अर्थ आहे? )

डार्ट मिशनने डीडीमाॅस आणि डायमाॅर्फोस या लघुग्रहांची रचना, खडक, माती आणि टक्करपूर्वी त्यांचे वातावरण यांचाही अभ्यास केला. या मोहिमेदरम्यान कायनेटिस इम्पॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. डिडिमाॅसचा व्यास 2600 फूट आहे. डायमाॅर्फोस त्याच्याभोवती फिरतो. याचा व्यास 525 फूट आहे. आता टक्कर झाल्यानंतर दोन्ही दगडांच्या दिशा आणि वेगातली बदलांचा अभ्यास केला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.