NASA चे मून मिशन ‘ऑटोमस-1’ यशस्वीरित्या लाॅंच

99

यूएस स्पेस एजन्सी नासा मून मिशन आर्टेमिस-1 यशस्वीरित्या लाॅंच केले आहे. हे प्रक्षेपण 16 नोव्हेंबरला फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरुन करण्यात आले आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे. आर्टेमिस-1 मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. नासा या मिशनच्या माध्यामातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवत आहे. हे यान 42 दिवसांत चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येईल. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

आर्टेमिस-1 मोहिमेदरम्यान, ओरियन आणि एमसएलएस राॅकेट चंद्रावर पोहोचेल आणि 42 दिवसांत पृथ्वीवर परत येईल. जर हे मिशन यशस्वी झाले तर, 2025 पर्यंत अतंराळवीर चंद्रावर पाठवले जातील. आर्टेमिस-1 मोहिमेनंतरच नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील. जेणेकरुन चंद्राच्या पलीकडे जाऊन मंगळाचा प्रवासही करता येईल.

( हेही वाचा: आता PMPML बसने प्रवास करण्यासाठी पोलिसांनाही काढावे लागणार तिकीट )

आर्टेमिक-1 मून मिशन काय आहे?

अमेरिका आपल्या मून मिशन आर्टेमिसच्या माध्यमातून तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहेत. आर्टेमिस-1 हे या दिशेने पहिले पाऊल आहे. ओरियन अंतराळयान मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी बनवण्यात आले आहे. हे यान प्रथम पृथ्वीपासून चंद्रापर्यंत 4.50 लाख किमी प्रवास करेल. एवढा लांब प्रवास करणारे ओरियन अंतराळयान हे पहिले अंतराळयान असेल. दरम्यान, मुख्य मून मिशनसाठी हे एक चाचणी उड्डाण आहे. ज्यामध्ये एकही अंतराळवीर पाठवला जाणार नाही. या उड्डाणामुळे चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही? हे जाणून घेण्याचे शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे. तसेच, चंद्रावर गेल्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परत येऊ शकतील का? हे देखील पाहण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.