नाशिकमध्ये पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू!

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून १८ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबावर मोठा दुखःचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पवन नगरच्या साईज्योत अपार्टमेंट, कृष्णा साडी सेंटरच्या मागे ही घटना रविवारी घडली आहे. या चिमुकलीचे नाव समृद्धी राहुल खैरनार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – आंतरराष्ट्रीय सिंह दिन विशेष : इस्त्राईलच्या झेब्राने अडकवले गुजरातच्या सिंहांचे मुंबई दर्शन)

बाल्कनीत खेळत असताना समृद्धीचा तोल गेला आणि ती पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. ही घटना घडली तेव्हा या चिमुकलीचे आई वडील नेमके कोठे होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच वसईमध्ये देखील अशीच बाल्कनीतून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. वसईच्या पश्चिमेला असलेल्या अग्रवाल कॉम्लेक्समधील रेजन्सी विला या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडून श्रेया महाजन या अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. श्रेया यावेळी घरात एकटीच होती. श्रेयाची आई तिच्या बहिणीला शाळेत सोडायला गेली होती. त्यावेळी मोबाईलमध्ये खेळता खेळता श्रेया बाल्कनीत आली आणि तोल जाऊन थेड खाली कोसळली होती, असे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here