नाशिक-सिन्नर महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

89

नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरू असून सिन्नरच्या मोहदरी घाटात ३ वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार? असे असतील दर…)

सिन्नरजवळ मोहदरी घाटात स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून पलिकडच्या लेनवर जाऊन आदळळी. यात ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी नाशिकचे असून ते एका लग्नसोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते. दुपारच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली, यानंतर माळेगाव एमआयडीसी पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. यातील जखमींना सिन्नर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.