त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची बस उलटली; बुलढाण्यातील १३ जण जखमी

त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची मिनी बस उलटली असून २९ पैकी १३ प्रवासी जखमी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून परतल्यानंतर माघारी परतत असताना या बसचा अपघात झाला.

( हेही वाचा : औरंगाबादमध्ये दुहेरी हत्याकांड! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीची हत्या)

त्र्यंबकेश्वरजवळ अपघात 

बुलढाणा येथून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याचे बोलले जात असून या बसमध्ये एकूण २९ प्रवासी होते. त्यापैकी १३ जण जखणी असून प्रेमसिंग फापळ हे गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवासी भाविक बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर अली असून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे या वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बस थेट नाल्यात उलटून समोरच्या झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही भाविक जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here