नाशिकमध्ये एका खासगी बसला आग लागून 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; 38 जण जखमी

142

महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक- औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही चिंतामणी ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातात होरपळून 11 जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळहून मुंबईकडे जाणा-या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. 38 जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: कोकणातील उद्धव ठाकरेंचे समर्थक आमदार चौकशीच्या फेऱ्यात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.