नाशिक बस अपघातात मृतांचा आकडा वाढला; 12 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरुच

194

नाशिकमध्ये बसमधील दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, संख्या बारावर गेली आहे. तर प्रशासनाकडून अद्यापही मदतकार्य सुरु आहे. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत. बस अपघातातील 41 जणांवर जिल्हा रुग्णालयात तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

यवतमाळहून मुंबईकडे जाणा-या खासगी बस व नाशिकहून औरंगाबादकडे जाणा-या ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर खासगी बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान, या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद हायवेमध्ये सिटीमध्ये साधारण साडेपाच वाजता भीषण अपघात झाला. यावेळी बसला आग लागली.

( हेही वाचा: Nashik bus Fire:नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

DNA टेस्ट करणार

मृतामधील फक्त दोन प्रवाशांची ओळख पटलेला असून इतर प्रवासांची ओळख पटवणे मुश्किल असल्याने त्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. दरम्यान, बसला आग लागल्याच्या घटनांसदर्भात कठोर पाऊले उचलण्यात येऊन यासाठी पोलीस प्रशासन आणि आरटीओ आणि इतर स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.