Nashik Fire: 100 हून अधिक जण अडकल्याची भीती; मुख्यमंत्री घटनास्थळाकडे रवाना

नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनीत मोठा ब्लास्ट झाला आहे. यानंतर भीषण आग लागली असून, आगीचे लोट आकाशात पसरले आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. सकाळी 11:30 च्या दरम्यान, स्फोट होऊन आग लागल्याचे वृत्त आहे. अद्यापही या आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. या आगीत कंपनीतील 100 पेक्षा जास्त कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 14 जखमी कामगारांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर कामगारांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

( हेही वाचा: नवी मुंबईत एक कोटींचे अमली पदार्थ जप्त; 16 नायजेरीयन अटकेत )

संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य

आग इतकी मोठी आहे की, धुराचे मोठे मोठे लोट आकाशात दिसत आहेत. कंपनीच्या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. कंपनीत लागलेली आग भीषण असून कंपनीतील काम करणारे काही कामगार होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अद्यापही या आगीचे कारण समजू शकलेले नाही. बाॅयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर काही वेळ कंपनीत छोटे छोटे स्फोट होत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here